कर्नाटक विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याला बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी द्यावी, अन्यथा कर्नाटकातील मंत्र्यांना महाराष्ट्रात प्रवेश बंदी करण्यात येईल, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने कोल्हापूरचे जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनाच्या माध्यमातून बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मेळाव्याला परवानगी द्यावी, यासंदर्भात कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा करावी, असे नमूद करण्यात आले आहे.
यासंदर्भात शिवसेना जिल्हाप्रमुख, उपनेते संजय पवार बोलताना म्हणाले, बेळगावमध्ये आयोजिण्यात आलेल्या अधिवेशनादरम्यान कर्नाटकातील अनेक मंत्री महाराष्ट्रात व कोल्हापुरात येतात आणि महाराष्ट्र सरकार त्यांना कोणतीही बंदी घालत नाही. मात्र महामेळाव्यास स्थानिक प्रशासनाने परवानगी नाकारल्यास कर्नाटकातील मंत्र्यांना महाराष्ट्रात प्रवेश बंदी करण्यात येईल, असे ते म्हणाले.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख, उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख सुनील मोदी, रविकिरण इंगवले, शहर समन्वयक हर्षल सुर्वे, विशाल देवकुळे, जिल्हा महिला संघटक सौ. प्रतिज्ञा उत्तुरे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Recent Comments