बेळगाव जिल्हा पोलिस विभागाद्वारे आयोजित पोलिस वार्षिक क्रीडास्पर्धा 2024 आज अधिकृतपणे सुरुवात झाली . . बेळगाव जिल्हा पोलिस परेड मैदानावर आजपासून पोलिस वार्षिक क्रीडास्पर्धा सुरु झाल्या . आणि शहर पोलिस आयुक्त याडा मार्टिन यांनी क्रीडास्पर्धांचा प्रारंभ केला.

या वेळी बोलताना शहर पोलिस आयुक्त याडा मार्टिन यांनी सांगितले, “पोलिस दलात काम करताना ताणतणाव असतो. त्यामुळे क्रीडास्पर्धा ही एक उत्तम संधी आहे, जी शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी मदत करते. खेळांमध्ये सहभागी होऊन , सर्व पोलिस कर्मचारी एकत्र येऊन आपला सामूहिक उत्साह आणि सहकार्य दाखवू शकतात. क्रीडास्पर्धा पोलिस दलाला एकत्र आणण्याचा आणि त्यांचं एकमेकांसोबत सहयोग वाढवण्याचा एक चांगला मार्ग आहे.
यावेळी अतिरिक्त एसपी श्रुती, सहाय्यक एसपी बसरगी, डीएआर एसपी अशोक झुंझरवाडे यांच्यासह इतर पोलिस अधिकारी उपस्थित होते.

या क्रीस्पर्धांमध्ये मध्ये बेळगाव, बैलहोंगल , रामदुर्ग, गोकाक, चिकोडी, अथणी, महिला डीएआर आणि इतर पोलिस विभागांच्या टीम्स सहभागी झाल्या आहेत . एकंदरीत खेळ हे शारीरिक आरोग्य सुधारण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे, आणि ही क्रीडास्पर्धा पोलिस कर्मचारी आणि समाजातील लोकांमध्ये उत्साह आणि सहकार्य निर्माण करण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरले आहे.


Recent Comments