Belagavi

चला किल्ले बनवूया स्पर्धेत रघुनाथ पेठ अनगोळ येथील शिवनेरी युवक मंडळाचा प्रथम क्रमांक

Share

बालचमुना प्रोत्साहन देण्यासाठी सकाळतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चला किल्ले बनवूया स्पर्धेमध्ये रघुनाथ पेठ अनगोळ येथील शिवनेरी युवक मंडळाने प्रथम क्रमांक मिळवला असून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेल्या किल्ला स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम शनिवारी रामनाथ मंगल कार्यालय येथे शिवप्रेमींच्या मोठ्या उत्साहात पार पडला आहे.

किल्ला स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी बेळगाव शहर व तालुक्यातील बालचमू मोठ्या संख्येने रामनाथ मंगल कार्यालय येथे उपस्थित होते. प्रारंभी किल्ला स्पर्धेचे प्रायोजक असलेले उद्योजक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आर एम चौगुले, पुनम हंगिरगेकर, व्याख्यात्या स्वाती पाटील, सकाळ बेळगाव कार्यालयाचे मुख्य व्यवस्थापक उदय होनगेकर, मुख्य बातमीदार मल्लिकार्जुन मुगळी, दुर्गवीर प्रतिष्ठानचे सागर मुतगेकर, विलास धामणेकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

उद्योजक आर एम चौगुले , आणि व्याख्यात्या स्वाती पाटील यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले . भांदूर गल्ली बेळगाव येथील स्वराज्य मित्र मंडळाच्या किल्ले लाहोरला द्वितीय क्रमांक, बाल शिवाजी युवक मंडळ नाथ पै नगर अनगोळ यांच्या किल्ले विजयदुर्गला तृतीय क्रमांक मिळाला असून शिवतेज ग्रुप, वेंगुर्ला रोड, तुरमुरी, शिवदैवत किल्ला ग्रुप रामलिंग गल्ली तुरमुरी,

हनुमान युवक मंडळ भांदूर गल्ली अनगोळ किल्ले धारूर, मारुती गल्ली खादरवाडी किल्ले जंजिरा व गांधी गल्ली बसवान गल्ली येथील जय युवक मंडळाच्या किल्ले सुवर्णदुर्ग या किल्ल्याला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले आहे. तसेच स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. बक्षीस वितरण कार्यक्रमावेळी जय भवानी जय शिवाजी आदी घोषणा देऊन कार्यालयाचा परिसर दणाणून सोडण्यात येत होता.

 

 

 

Tags: