Belagavi

जागतिक एड्स दिनानिमित्त बेळगावात जनजागृती रॅली

Share

जागतिक एड्स दिनानिमित्त आज बेळगावात ‘माझा हक्क माझे आरोग्य’ या घोषवाक्यांतर्गत जनजागृती रॅली काढण्यात आली.

जागतिक एड्स दिनाच्या पार्श्वभूमीवर आज बेळगाव जिल्हा प्रशासन, आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या आवारात जनजागृती रॅली काढण्यात आली. अपर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.ठुक्कर, डॉ.विठ्ठल यांनी या यातील हिरवे निशाण दाखवून चालना दिली

यावेळी बोलताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . ठुक्कर म्हणाले की, बेळगावात 1987 मध्ये एड्सचा पहिला रुग्ण नोंदला गेला होता. नंतरच्या जनजागृतीमुळे आता एड्सच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे दिसून येते. बेळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एड्स तपासणीसाठी आरोग्य केंद्रांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. प्राणघातक एड्स रोखण्यासाठी केवळ आरोग्य विभागाचे काम नाही तर जनतेनेही यामध्ये हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले.

ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरू होऊन राणी चन्नम्मा सर्कलमार्गे बिम्स येथे संपली.

Tags: