Belagavi

अधिवेशनासाठी विविध विभागांकडून हफ्ता वसुली : भीमाप्पा गडाद यांचा आरोप

Share

बेळगाव जिल्ह्यातील सुर्वणविधान सौध येथे चालू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी विविध विभागांकडून हफ्ता वसुली केली जात असल्याचा आरोप आर.टी.आय. कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यांनी केला आहे .

भीमप्पा गडाद यांनी सांगितले की, बेळगावच्या सुर्वणविधान सौध मध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी प्रशासन आणि तहसीलदार कार्यालय कडून प्रत्येकी ५०,००० रुपये अशी वसुली केली जात आहे. विविध विभागांची हफ्ता वसुलीचा प्रकार चालू आहे.

भीमप्पा गडाद यांनी याबाबत सरकारला पत्र पाठवले होते आणि तपासाची मागणी केली होती. सरकारकडून जिल्हा प्रशासनाला तपासाचे निर्देशही आले होते, पण जिल्हा प्रशासनाने तपास करण्याबाबत कुठलीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे याबाबत अनेक संशय निर्माण होऊन प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे, असे गडाद यांनी म्हटले आहे.

भीमप्पा गडाद यांनी हफ्ता वसुली आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेबाबत सरकारकडून योग्य तपास आणि कारवाईची मागणी केली आहे. जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे यावर संशय वाढला असून, सरकारकडून योग्य कारवाईची अपेक्षा आहे.

Tags: