Dharwad

पंचमसाली 2A आरक्षण ट्रॅक्टर रॅली कोणत्याही कारणास्तव थांबणार नाही- विरोधी पक्षनेते बेल्लद

Share

बसवजय मृत्युंजय स्वामीजींच्या नेतृत्वाखाली पंचमसालींच्या आंदोलनाची ट्रॅक्टर रॅली कोणत्याही कारणासाठी थांबणार नाही. ट्रॅक्टर रॅली जशी चालली आहे, तशी चालत राहील, असा टोला विरोधी पक्ष उपनेते अरविंद बेल्लद यांनी विजयानंद काशप्पनवर याना लगावला .

पंचमसाली आरक्षणाच्या आंदोलनात दोन भाग झालेल्या मुद्द्याबद्दल धारवाडमध्ये प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले, “काशप्पनवर अध्यक्ष आहेत. त्यांना ते पद मिळाल्यामुळे त्यांची जबाबदारी आणखी वाढली आहे. आमची पार्टी सत्तेत असताना, बसनगौडा पाटील, मी आणि सिद्धू सवदी यांच्यासह आम्ही आरक्षणासाठी सरकारवर दबाव टाकला होता.

भाजप सरकारने पंचमसालींना 6% आरक्षण दिले होते. सध्या काँग्रेस सरकारने ते स्थगित केले आहे. याच्या विरोधात पंचमसालींच्या आमदारांनी, मंत्र्यांनी लढा दिला पाहिजे. सरकारमध्ये असले म्हणजे सरकारने केलेले सर्व काही खरे असं नाही. अध्यक्ष असलेल्या काशप्पनवर सर्व गोष्टींमध्ये शांत राहायला लागले आहेत.

पंचमसालींच्या जय मृत्युंजय स्वामिजी आमदारांवर अवलंबून नाही. प्रत्येक गावात लोक स्वामिजींवर विश्वास ठेवतात. लोकांचे प्रेम स्वामीजींवर आहे. कोणत्याही कारणांमुळे पंचमसालींचे आंदोलन असलेल्या ट्रॅक्टर रॅली थांबणार नाही,” असे ते म्हणाले.

 

Tags: