खानापुर- पारिश्वाड मार्गावरील यडोगा क्रॉस येथे परिवहन बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दोड्डहोसूर गावातील दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

संदेश उर्फ गोविंद गोपाळ तिवोलकर (वय 25) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, खानापूर केएसआरटीसी आगाराची बस चापगावहून यडोगा मार्गे खानापूरला जात असताना हा अपघात झाला. हा तरुण दुचाकीवरून दोड्ड होसूर गावाकडे जात असताना. यडोगा क्रॉसजवळ ही घटना घडली. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी खानापुर शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.
हा तरुण (महाराष्ट्र) येथे गवंडी म्हणून काम करत होता. तो वैयक्तिक कामानिमित्त गावी आला असता हा अपघात घडला. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहिणी असा परिवार आहे. तरुणाच्या अपघाती मृत्यूमुळे दोड्डहोसूर गावावर शोककळा पसरली असून याप्रकरणी खानापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments