Belagavi

बेळगावमध्ये डबल राऊंड फायरिंग : गोळीबारात युवक जखमी

Share

बेळगावमध्ये झालेल्या गोळीबारात एक युवक जखमी झाल्याची घटना घडली आहे. पूर्ववैमन्यस्यातून करण्यात आलेल्या गोळीबारात युवकाच्या हनुवटीला गोळी लागली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बेळगावच्या महांतेश नगर के. एम. एफ. डेअरी जवळ एक युवकावर दोन वेळा गोळीबार करण्यात आला. युवकाच्या पायावर आणि गळ्यावर गोळी लागल्यामुळे सदर युवक गंभीर जखमी झाला असून जखमी युवकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रणितकुमार (वय ३१, रा. टिळकवाडी) असे जखमी युवकाचे नाव असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच, शहर पोलिस आयुक्त याडा मार्टिन मारबानियांग यांनी रुग्णालयात जाऊन जखमी युवकाच्या आरोग्याबाबत माहिती घेतली. हा हल्ला पूर्व वैमनस्यातून झाल्याचे सांगण्यात येत असून याबाबत पोलीस अधिक तपास घेत आहेत.

Tags: