सालाबादप्रमाणे यंदाही व्हॅक्सिन डेपो मैदानावर म ए समितीने महामेळावा घेण्याचे निश्चित करण्यात आले असून यासंदर्भात प्रशासनाला पूर्वकल्पना, निवेदन आणि रूपरेषा ठरविण्यासंदर्भात मध्यवर्ती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत यंदाचा महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला.
या बैठकीत यंदाचा महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला. अटक झाली तरीही कोणत्याही परिस्थितीत महामेळावा भरविण्यात येईलच, असा निश्चय करण्यात आला. कर्नाटक सरकारच्या वतीने दरवर्षी सुवर्णविधानसौध येथे हिवाळी अधिवेशन भरविण्यात येते. याविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजिण्यात येतो. यानुसार यंदाही महामेळावा आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

यावेळी बोलताना तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष, माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले, यंदाही कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाविरोधात मराठी भाषिकांचा महामेळावा भरविण्याचे ठरविण्यात आले असून ९ डिसेंबर रोजी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. टिळकवाडी परिसरातील व्हॅक्सिन डेपो मैदानावर महामेळावा घेण्यात येणार असून या पार्श्वभूमीवर येत्या गुरुवार डी. २८ नोव्हेंबर रोजी आंदोलनाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. ९ डिसेंबर रोजी होणाऱ्या महामेळाव्यासहित मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना निवेदन देण्याचेही ठरविण्यात आले आहे. यासाठी घटक समित्यांच्या पातळीवर जनजागृती करण्याचे काम करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीत सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खानापूर समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई, समिती नेते आर. एम. चौगुले, विकास कलघटगी, बी. एस. पाटील, ऍड. एम. जी. पाटील, प्रमोद सडेकर, एम. बी. गुरव, अनिल पाटील, डी. बी. पाटील, पियुष हावळ, मोनाप्पा पाटील, बी. डी. मोहनगेकर, आर. के. पाटील आदींसह समिती नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments