केडीसी डेंटल रुग्णालयाने धारवाडच्या कीरेसूरु गावातील स्थानिकांसाठी मोफत दात तपासणी शिबीर आयोजित केले होते . 150 पेक्षा जास्त स्थानिक नागरिकांसह लहान मुलांनी या शिबिरात सहभागी होऊन आपले दात तपासून घेतले .
केडीसी डेंटल रुग्णालयाच्या तज्ञ दंतचिकित्सकांनी , तपासणी करत असताना, दातांच्या समस्यांवर जागरूकता निर्माण केली. शिबीर गावातील सभागृहात आयोजित केले होते आणि 150 पेक्षा जास्त लोकांनी शिबिराचा लाभ घेतला. सर्व सहभागी लोकांना तपासणीसह काही मोफत औषधं देखील वितरित करण्यात आली.
या प्रसंगी हुबळीतील डॉ. निरंजन परमशेट्टी, ग्राम पंचायत अध्यक्ष बी .के. पाटील, हुबळी तालुका भाजप अध्यक्ष मंजुनाथ गणी, मल्लैया हिरेमठ यांसह अनेक महत्त्वाचे मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments