एकीकडे बेळगाव येथील वकिलांनी बनावट वकिलांवर कारवाईची मागणी करत आंदोलन केले, तर दुसरीकडे सोनिया धारा या महिला वकिलाने आपल्यावर जातीय अन्याय व लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी संरक्षणाची मागणी केली आहे.
बेळगाव येथील वकील सोनिया धारा यांनी आपल्यावर जातीय आणि लैंगिक छळ झाल्याचे आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या, “फक्त परगावातून आले असल्यामुळेच मला डावलले जात आहे. वकील असतानाही माझ्यावर अन्याय केला जात आहे. न्यायासाठी लढणाऱ्या व्यक्तीला असे वागणे योग्य नाही.” तसेच, त्यांनी वकील बसवराज जिरली यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले की, “बसवराज जिरली यांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार करून जातीय अवमान केला आहे. शिवाय, माझ्या जीवाला धोका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे मला संरक्षण देण्यात यावे,” अशी त्यांची मागणी आहे.
या प्रकरणामुळे वकिलांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. बेळगाव वकील संघाने यावर त्वरित चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. या घटनेमुळे वकील संघटनेतही मतभेद निर्माण झाले आहेत. सोनिया धारा यांच्या या आरोपांवरून वकिलांच्या वर्तुळात चर्चा सुरू असून, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
Recent Comments