धारवाडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत भाजप प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र यांनी वक्फ बोर्डासंबंधी हाती घेतलेल्या आंदोलनावर भाष्य केले. त्यांनी अप्रत्यक्षरीत्या बसनगौडा पाटील यत्नाळांना इशारा देत आगामी काळात कोण अनाथ ठरतो ते पाहू, असे वक्तव्य केले. तसेच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कारभारावरही जोरदार टीका केली.
धारवाड येथे भाजप प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी वक्फ बोर्डाच्या मुद्द्यावरून अप्रत्यक्षरीत्या बसनगौडा पाटील यत्नाळांना इशारा दिला. आम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात नाही, आमचे सरकार व भाजप पक्ष शेतकऱ्यांसाठीच आहे. आम्ही शेतकऱ्यांचे हक्क कुठल्याही परिस्थितीत नाकारणार नाही, असे विजयेंद्र यांनी सांगितले.
वक्फ बोर्डावर बोलताना विजयेंद्र म्हणाले की, हे आंदोलन माझे किंवा यत्नाळांचे नाही, तर केंद्र सरकारने यावर समिती स्थापन केली आहे. याचा श्रेयवाद महत्त्वाचा नाही. त्यांनी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांच्या जमिनींचे नुकसान होऊ देणार नाही आणि वक्फ कायद्याविरोधात भाजपची भूमिका ठाम आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर टीका करताना विजयेंद्र म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी ५० कोटी रुपयांच्या ऑफरचा दावा केला आहे. परंतु, हा दावा आम्ही नाकारतो. उलट काँग्रेसचेच काही आमदार निधीच्या विषयावर नाराज आहेत. मुख्यमंत्री कोणत्याही क्षणी राजीनामा देऊ शकतात, असेच वातावरण काँग्रेसमध्ये निर्माण झाले आहे.
याशिवाय, वक्फ बोर्डाच्या मुद्द्यावर राज्यभर जिल्हास्तरीय आंदोलने आयोजित केली जातील, असेही विजयेंद्र यांनी जाहीर केले.
Recent Comments