Uncategorized

वकिलांवरील हल्ल्याचा निषेध : धारवाडमध्ये वकिलांचे आंदोलन

Share

म्हैसूरसह देशभरात वकिलांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी करत धारवाड येथे वकिलांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली.

धारवाड येथील सिव्हिल न्यायालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत वकिलांनी निदर्शने करत जोरदार घोषणा दिल्या. धारवाड जिल्हा वकील संघटनेच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात म्हैसूरमधील वकिलांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. देशभरात वकिलांवरील हल्ल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे, असे वकिलांनी सांगितले.

वकिलांनी म्हटले की, तातडीने राज्य सरकारांनी वकिलांना योग्य सुरक्षा द्यावी आणि हल्लेखोरांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. जर या मागणीकडे दुर्लक्ष झाले, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, अशी वकिलांनी चेतावणी दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले.

Tags: