पंचमसाली समाजाचे ज्येष्ठ नेते आणि बेळगाव जिल्हा अध्यक्ष आर.के. पाटील (५८) यांचे निधन झाले.
काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, त्यावेळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंचमसाली समाजासाठी संघर्ष करणाऱ्या आर.के. पाटील यांनी समाजाला नवी दिशा देण्यासाठी मोलाचे कार्य केले. कूडलसंगम बसव जयमृत्युंजय स्वामी यांच्या नेतृत्वाखाली पंचमसाली आरक्षण लढ्यात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता.
आर.के. पाटील यांच्या निधनामुळे समाजाला मोठा धक्का बसला आहे. महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि विधान परिषदेचे सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांच्या कुटुंबाला या दु:खातून सावरण्याचे बळ देवो, अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.
Recent Comments