Uncategorized

कप्पटगुड्डला संरक्षित जैवविविधता क्षेत्र म्हणून घोषित करा : गदग मठाचे निवेदन

Share

गदग जिल्ह्यातील कप्पटगुड्ड वनक्षेत्राचे संरक्षण कारण्यासाठी श्री शिवकुमार स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली गदग मठाने बेळगाव प्रादेशिक आयुक्तांकडे निवेदन देऊन कप्पटगुड्ड वनक्षेत्राला संरक्षित जैवविविधता क्षेत्र म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे.

गदग जिल्ह्यातील कप्पटगुड्ड वनक्षेत्र हे ८०,००० एकर क्षेत्राचे विस्तृत जंगल आहे. हे जैवविविधतेचे संरक्षण करणारे महत्त्वपूर्ण ठिकाण म्हणून ओळखले जाते. श्री शिवकुमार स्वामीजी आणि गदग मठातील इतर प्रमुख व्यक्ती, पर्यावरण कार्यकर्ते यांच्यासह अनेक समाजसेवकांनी राज्य सरकारला या वनक्षेत्राचा संरक्षित जैवविविधता क्षेत्र म्हणून दर्जा देण्याची मागणी करण्यात आली.

या निवेदनात कप्पटगुड्डच्या १० किमी परिघातील खाणकाम त्वरित थांबवण्याची आणि राज्य सरकारने या क्षेत्राच्या संरक्षणासाठी ठोस धोरण राबवण्याची आवश्यकता स्पष्ट करण्यात आली आहे. सरकारने पॅराडाईस क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात खाणकाम सुरू ठेवण्याचा निर्णय पर्यावरणासाठी खूप धोक्याचा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या संदर्भात पर्यावरण प्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सरकारच्या धोरणावर टीका केली असून, कप्पटगुड्डा क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी जनतेला जागरूक करणारा संघर्ष सुरू ठेवला जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.

कप्पटगुड्डाच्या संरक्षणासाठी पर्यावरण प्रेमी, समाजसेवक आणि स्थानिक नागरिक एकत्र आले असून, खाणकामाचे विरोध करणारा लढा त्यांनी घेतला आहे. सरकारने या क्षेत्राच्या संरक्षणासाठी योग्य पावले उचलावीत, अशी मागणी केली जात आहे

Tags: