१२ डिसेंबरपासून सुरू होणारी सौंदत्ती श्री रेणुका यल्लम्मा यात्रा भक्तांच्या मोठ्या उपस्थितीने सजणार आहे. यानिमित्ताने भक्तांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात, असा आग्रह कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेने केला आहे.
आज कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे शिष्टमंडळाने बेळगाव जिल्हा अधिकारी कार्यालयात भेट देऊन जिल्हा निवेदन सादर केले. सौंदत्ती श्री रेणुका यल्लम्मा यात्रेसाठी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि आंध्रप्रदेश येथून लाखो भक्त दाखल होतात. यावर्षी १२ डिसेंबरपासून हि यात्रा सुरु होत असून यात्रा स्थळावर भक्तांच्या सोयीसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करणे अत्यंत आवश्यक आहे.
कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे प्रमुख शुभाष रामचंद्र जाधव यांनी सांगितले की, यात्रा स्थळावर स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था, शौचालयांची सुविधा यांसारख्या मूलभूत सोयीसुविधांची व्यवस्था केली जावी, जेणेकरून भक्तांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये. यासाठी प्रशासनाला त्वरित आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी निवेदनात नमूद केले.
यावेळी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Recent Comments