बेळगावमध्ये 71व्या अखिल भारतीय सहकार साप्ताह समारोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. मात्र या दरम्यान सहकार क्षेत्राची स्थिती सुधारण्यासाठी शेतकऱ्यांनि आग्रह करत आक्रोश व्यक्त केला.
आज बेळगावच्या केएलई संस्थेच्या जिरगे सभागृहात 71व्या अखिल भारतीय सहकार साप्ताह समारोप समारंभ आयोजित करण्यात आला. परंतु, या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्यांनी सभागृहाबाहेर निदर्शने केली. ‘राजकारण्यांना सहकार क्षेत्रातून बाहेर काढा’ अशा घोषणा देत शेतकरी संघटनांनी संताप व्यक्त केला.
सहकार क्षेत्राला भष्टाचाराच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे आणि राजकारणी या क्षेत्रात घुसून सर्व काही खराब करत आहेत, राजकारणी सहकार क्षेत्रासाठी हानिकारक आहेत . राजकारणी आमच्या कामात हस्तक्षेप करत आहेत यामुळे आज सहकार क्षेत्राचा ऱ्हास होत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी नेते प्रकाश नायक यांनी व्यक्त केली.
सहकार क्षेत्राची वास्तविक गरज असलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी एकजुट होऊन आपल्या भूमिकेला जाणीव करून दिली आहे, विशेषतः बेळगावच्या मार्कंडेय शुगर्स आणि एम.के. हुब्बळीच्या राणी शुगर्स या कारखान्यांची स्थिती घातक बनली आहे. कारखाने दिवाळखोरीत निघत राजकारणी या क्षेत्रात मोठा हस्तक्षेप करत आहेत, अशी टीका शेतकरी नेते चुनप्पा पूजारी यांनी व्यक्त केली.
Recent Comments