Uncategorized

बीम्स प्रशासनाची सर्जरी करणे गरजेचे ! : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

Share

महाराष्ट्रात भाजपने खोटे व्हिडिओ दाखवून कर्नाटकच्या गृहलक्ष्मीविरोधात खोटा प्रचार केला. मात्र, कर्नाटकातील हमीभाव योजनांनी लोकांची दाद मिळवली असून यावेळी महाविकास आघाडीचीच सत्ता येईल, असा विश्वास महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केला.

बेळगाव जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेच्या मृत्यूबाबत देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. जिल्हा रुग्णालयातील सर्व यंत्रणा कार्यान्वित करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी बेळगाव मध्ये माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन तपासणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बीपीएल कार्ड रद्द करणे तसेच गृहलक्ष्मी योजना रद्द करणे याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, जीएसटी आणि आयकर ज्यांना लागू होत नाही, त्यांनाच गृहलक्ष्मी योजना लागू होईल .भाजपकडून काँग्रेसच्या आमदारांच्या खरेदीबाबत बोलताना त्या म्हणाल्या, भाजपकडून सातत्याने हा प्रयत्न सुरू आहे. खुद्द भाजप आमदारांनीच याबाबतची माहिती सभागृहात दिली आहे. मात्र आमचे सरकार सुरक्षित आहे, असे त्या म्हणाल्या.

कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन ९ डिसेंबरपासून बेळगावातील सुवर्णसौध येथे होणार आहे. उत्तर कर्नाटकचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि मागण्या पूर्ण करण्यासाठी सभागृहात चर्चा केली जाईल, या अधिवेशनात बेळगावच्या विभाजनाबाबत चर्चा होऊ शकते, अशी माहिती त्यांनी दिली.

महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळाला असून यावेळी काँग्रेसची सत्ता येणार आहे. महाराष्ट्रात भाजपने कर्नाटकातील गृहलक्ष्मी यांच्याविरोधात खोटे व्हिडिओ दाखवून लोकांची दिशाभूल केली आहे. कर्नाटकातील प्रकल्पांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीला आणि कर्नाटकातील पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचे त्या म्हणाल्या.

Tags: