“कनकदास हे केवळ संतच नव्हे, तर महान तत्त्वज्ञ आणि समाजसुधारकही होते. ते खरे अर्थाने विश्वमानव होते,” असे गौरवोद्गार मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कनकदास जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात उच्चारले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज कनकदास जयंतीनिमित्त कनकदासांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, “भक्त कनकदास जयंतीचे आयोजन सरकारतर्फे करण्यात येत आहे. कनकदास हे हावेरी जिल्ह्यातील बाड या गावी जन्मलेले होते आणि कागिनेली हि त्यांची कर्मभूमी होती. त्यांच्या काव्य आणि कीर्तनांच्या निर्मितीमुळे त्यांनी समाजात अद्वितीय योगदान दिले आहे.”
मुख्यमंत्र्यांनी कनकदासांच्या योगदानाचे महत्व विशद करताना सांगितले की, “ते एक महान तत्त्वज्ञ होते, ज्यांनी मानवतेच्या कल्याणासाठी कार्य केले.” यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व नागरिकांना कनकदास जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आणि समाजाच्या उन्नतीसाठी कनकदासांनी दिलेल्या संदेशाची आठवण करून दिली.
Recent Comments