Uncategorized

बसवन कुडची येथे म्हैस पळवण्याची शर्यत उत्साहात

Share

बसवन कुडची येथे रविवारी, 17 नोव्हेंबर रोजी म्हैस पळवण्याची शर्यत मोठ्या उत्साहात पार पडली. या शर्यतीचे उद्घाटन मुरगेंद्रगौडा पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हार घालून आणि पूजा करून करण्यात आले.

यानंतर नगरसेवक बसवराज मोदगेकर, रवी कोठबागी, परशराम बेडका, महेंद्र पाटील, कुंतू पाटील, निळकंठ स्वामी हिरेमठ यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते फित कापून आणि दीपप्रज्वलन करून शर्यतीला प्रारंभ करण्यात आला.

शर्यतीत गावातील व बेळगाव परिसरातील म्हैस मालक आणि गवळी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी भरत पाटील, यल्लाप्पा मुचंडिकर, प्रकाश बेडका, बसवंत तारिहाळकर, बबन सडेकर आणि गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. शर्यतीचे सूत्रसंचलन शिक्षक महेश इटगेकर यांनी केले.

या उद्घाटन समारंभात मुरगेंद्रगौडा पाटील, नगरसेवक बसवराज मोदगेकर, परशराम बेडका, रवी कोठबागी, निळकंठ स्वामी हिरेमठ, कुंतू पाटील आणि बसवंत हलगेकर यांच्या उपस्थितीत या शर्यतीला सुरुवात झाली. शर्यत यशस्वी पार पाडण्यासाठी बसवंत मुचंडीकर, बसवराज चौगुले, सुरज दिवटे आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Tags: