Belagavi

बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या नावाने फेक अकाऊंट; बनावट अकाऊंटवरून पैशांची मागणी

Share

बेळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांच्या नावाने फेक फेसबुक अकाऊंट तयार करून राजस्थानमधील एका व्यक्तीने सोशल मिडियावर फसवणूक केली आहे. यावर पोलिसांनी तपास सुरू केला असून, संबंधित व्यक्तीवर कारवाई केली जाईल .

गुरुवारी बेळगावमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले की, नुकतेच, एका बनावट फेसबुक अकाऊंटवर माझ्या वाढदिवसानिमित्त लाखो रुपयांचे फर्निचर फक्त 90 हजार रुपये मिळवू शकता असा संदेश दिला होता . . या संदेशाद्वारे राजस्थानमधील व्यक्तीने लोकांची फसवणूक केली आहे. तुम्ही एसपींचे मित्र आहात, म्हणून तुम्हाला कमी किमतीत फर्निचर मिळेल’ असे सांगून पैशाची मागणी केली जात होती.

ते पुढे म्हणाले की, हे फेक अकाऊंट केवळ माझ्या नावानेच नाही, तर गदग आणि मंड्याच्या एसपींच्या नावानेही तयार केले गेले होते. सोशल मीडियावर असलेल्या वास्तविक खात्यांना लक्ष देऊन, असे संदेश आले तरी कोणालाही पैसे देऊ नयेत,” असे आवाहन एसपी भीमाशंकर गुळेद यांनी केले आहे .

Tags: