Belagavi

“राष्ट्रीय शालेय स्कूल गेम्स स्पर्धेसाठी आबा हिंद क्लबच्या 14 जलतरणपटूंची अभिनंदनिय निवड”

Share

नुकत्याच बेंगलोर येथील बसवानगुडी जलतरण तलावात संपन्न झालेल्या कर्नाटक राज्य शैक्षणिक खात्याच्या राज्य पातळीवरील शालेय 14 वर्षाखालील व 17 वर्षाखालील मुला मुलींच्या जलतरण स्पर्धेत आबा व हिंद क्लबच्या जलतरण पटूनी उत्कृष्ट कामगिरी करताना 49 पदके संपादन केली यात 17 सुवर्ण 19 रौप्य व 13 कांस्यपदकांचा समावेश आहे. जलतरणपटुनी केलेली कामगिरी पुढील प्रमाणे :- 1. कुमार स्वरूप धनुचे सेंट पॉल्स स्कूल चार सुवर्ण एक रौप्य 2. कुमार तनुज सिंग सेंट मेरीज स्कूल चार सुवर्ण एक रौप्य 3. कुमार नील मोहिते सेंट पॉल्स स्कूल दोन सुवर्ण 4. कुमार ध्रुवरेड्डी मुल्लूर सेंट मेरीज स्कूल दोन रोप्य .
17 वर्षाखालील मुली 1. कुमारी वेदा खानोलकर चिटणीस स्कूल दोन सुवर्ण एक रौप्य दोन कास्य 2. कुमारी प्रणाली जाधव सेंट जोसेफ दोन रौप्य, एक कास्य 3. कुमारी अनन्या रामकृष्ण डीपी स्कूल दोन रौप्य, दोन कास्य 4. कुमारी प्रिशा पटेल डीपी स्कूल एक रौप्य, दोन कास्य 5. कुमारी किमया गायकवाड डी पी स्कूल एक रौप्य 6. कुमारी मनस्वी मुचंडी सेंट मेरी स्कूल दोन रौप्य 7. कुमारी विजयलक्ष्मी पुजारी मॉडेल इंग्लिश मीडियम एक कास्य 8. कुमारी प्राजक्ता प्रभू के एल एस स्कूल एक कास्य
14 वर्षाखालील मुले 1. कुमार अमोघ रामकृष्ण सेंट पॉल्स दोन रौप्य 2. कुमार युवराज मोहनगेकर सेंट झेवियर्स स्कूल तीन सुवर्ण 3. कुमार वरद खानोलकर चिटणीस स्कूल दोन रौप्य
14 वर्षाखालील मुली 1.कुमारी वैशाली घाटेगस्ती डीपी स्कूल दोन सुवर्ण, एक रौप्य, दोन कांस्य2. कुमारी तनवी कारेकर हेरवाडकर स्कूल दोन रौप्य
कुमार स्वरूप धनुचे, तनुज सिंग, नील मोहिते, ध्रुवरेड्डी मुल्लूर, युवराज मोहनगेकर, अमोघ रामकृष्ण, वरद खानोलकर, वेदा खानोलकर, प्रणाली जाधव, अनन्या रामकृष्ण, प्रिशा पटेल, किमया गायकवाड, वैशाली घाटेगस्ती, तनवी कारेकर या 14 मुला मुलींची दिनांक 24 ते 30 नोव्हेंबर रोजी राजकोट गुजरात येथे होणाऱ्या एस जी एफ आय राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेसाठी कर्नाटक राज्य संघात अभिनंदनिय निवड झाली आहे. वरील सर्व जलतरणपटूंना आबा व हिंद क्लबचे जलतरण प्रशिक्षक श्री विश्वास पवार, अमित जाधव, शिवराज मोहिते, रणजीत पाटील, सतीश धनुचे संदीप मोहिते यांचे बहुमोल मार्गदर्शन तर क्लबचे पदाधिकारी श्री मोहन सप्रे, श्री शितल हुलबत्ते, श्री अरविंद संगोळी, श्री राजू मुंदडा श्री राजू गडकरी, श्री सुनील हनमनावर, सौ शुभांगी मंगळूरकर यांचे प्रोत्साहन लाभते .

Tags: