Uncategorized

शिंदोळी क्रॉस येथे मुलांनी तयार केला पन्हाळगड किल्ला

Share

दिवाळीत छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले बांधण्यासाठी मुलांना प्रोत्साहन दिल्यास लहानपणापासूनच त्यांना त्यांच्या शिवकालीन इतिहासाची माहिती घेता येईल, असे मत नगरसेवक बसवराज मोदगेकर यांनी व्यक्त केले.

बेळगाव तालुक्यातील , शिंदोळी क्रॉस येथील , बसवन कुडची गावात , लहान मुलांनी बांधलेल्या कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पन्हाळगड किल्ल्याच्या प्रतिकृतीचे उद्घाटन करताना ते बोलत होते. दिवाळीत छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले बांधण्यासाठी मुलांना प्रोत्साहन दिल्यास लहानपणापासूनच त्यांना त्यांच्या सांस्कृतिक इतिहासाची माहिती घेता येईल, असे मत नगरसेवक बसवराज मोदगेकर यांनी व्यक्त केले.

लहान वयातच मुलांनी इतिहास शिकून किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवल्या आणि त्यांना आणखी प्रोत्साहन मिळावे तसेच ही बाब आश्चर्यकारक असल्याचेही अन्य मान्यवरांनी सांगितले.  समाजसेवक परशराम बेडका, राजशेखर हिरेमठ, महादेव आस्की, जगदीश पाटील, अजय मुदगेकर, प्रशांत पाटील, महेश इटेकर, भरत भातकांडे, बसवंत मुदगेकर, सचिन गोदगी, विठ्ठल हलकी आदींचा सहभाग होता.

Tags: