बेळगाव तालुक्यातील कलखांब ग्राम पंचायत कार्यालयाला रात्री उशिरा आग लावण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्राम पंचायत कार्यालयाच्या परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या तणावानंतर उपद्रवींनी सीसीटीव्ही कॅमेरेही चोरले असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
घटना कळल्यानुसार, काल रात्री उशिरा कलखांब ग्राम पंचायत कार्यालयात दोन गटांमध्ये तीव्र वाद सुरू होता. त्याच वादाच्या पार्श्वभूमीवर, रात्री उशिरा उपद्रवींनी ग्राम पंचायत कार्यालयाला आग लावली. शंकेनुसार, उपद्रवींनी बीयर बाटलीतुन पेट्रोल ओतून त्यावर कपड्याने आग आग लावली. ग्राम पंचायताच्या आवारात व आत बीयर बाटल्या सापडल्या आहेत.
याच घटनेतील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे उपद्रवींनी सीसीटीव्ही कॅमेरे चोरून नेले आहेत. घटनेचा पुरावा नष्ट करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे.
ही घटना मारिहाळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे, आणि पोलिसांनी संबंधित उपद्रवींविरुद्ध तपास सुरू केला आहे.
Recent Comments