बेळगावच्या सुप्रसिद्ध होमिओपॅथिक सल्लागार आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सोनाली सरनोबत यांना भारतीय जनसंपर्क परिषद (पीआरसीआय) तर्फे मंगळूर येथे प्रतिष्ठित चाणक्य राष्ट्रीय पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
भारतीय जनसंपर्क परिषदेतर्फे मंगळुरू येथील मोती महल कन्व्हेन्शन हॉलमध्ये आयोजित दोन दिवसीय संमेलनात बेळगावच्या डॉ सोनाली सरनोबत यांना हा पुरस्कार प्रदान केला .
ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक, मुख्य मार्गदर्शक आणि अध्यक्ष एमेरिटस, जयराम ),गीता शंकर आणि सुश्री स्वीजल फुर्ताडो (मिस ग्लोबल इंडिया 2024) यांच्या हस्ते डॉ सरनोबत याना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला . सदर परिषदेने आपल्या जगाला आकार देणारी प्रमुख आव्हाने आणि संधींवर चर्चा करण्यासाठी विविध उद्योगांतील व्यावसायिक आणि विचारवंतांना एकत्र आणले होते. त्यामध्ये डॉ. सरनोबत यांनी “डिजिटल वेलबीइंग आणि डिजिटल आरोग्याच्या व्यवस्थापनातील महिला” या विषयावरील पॅनल चर्चेत भाग घेतला.
डॉ. सोनाली सरनोबत यांना सामाजिक सेवा आणि उद्योजकीय नेतृत्वातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल चाणक्य राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. त्यांची एनजीओ नियती फाउंडेशन , मिशन नो सुसाईड आणि “होम मिनिस्टर” सारख्या उपक्रमांद्वारे महिला आणि युवा पिढीला सक्षम बनवते. पीआरसीआयच्या संमेलनामध्ये गौरवण्यात आलेल्या इतर उल्लेखनीय पुरस्कार विजेत्यांमध्ये प्रतापसिंह जाधव (दैनिक पुढारी) आणि आनंद संकेश्वर (व्हीआरएल ग्रुप) यांच्यासह विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्त्वांचा समावेश होता.
डॉ. सोनाली सरनोबत या वैद्यकशास्त्रातील सुवर्णपदक विजेत्या आणि होमिओपॅथिक प्रॅक्टिसमध्ये 20 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या प्रसिद्ध वैद्य आहेत. त्यांच्या नियती फाऊंडेशनतर्फे शैक्षणिक अनुदान, आरोग्य तपासणी शिबिरे, आपत्ती निवारण प्रयत्न वगैरे स्तुत्य उपक्रम राबवले जातात .
Recent Comments