३२ वी मेडिको लीगल संस्थेची राज्यस्तरीय वार्षिक परिषद बेळगावात आयोजित करण्यात आली. फॉरेन्सिक मेडिसिन आणि विषविज्ञान या शाखांचा मानवी जीवनातील महत्वाचा वाटा असल्याचे मंत्री एच. के. पाटील यांनी नमूद केले.
बेळगावातील केएलई जे. एन. वैद्यकीय महाविद्यालयाच्या फॉरेन्सिक मेडिसिन आणि विषविज्ञान विभागाच्या वतीने कर्नाटक मेडिको लीगल संस्थेची ३२ वी राज्यस्तरीय वार्षिक परिषद भव्यतेने पार पडली. शुक्रवारी केएलई शताब्दी सभागृहात झालेल्या या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटकचे कायदा, नागरी हक्क, संसदीय व्यवहार आणि पर्यटन मंत्री एच. के. पाटील आणि केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे उपस्थित होते.

या वेळी बोलताना मंत्री एच. के. पाटील यांनी फॉरेन्सिक मेडिसिन आणि विषविज्ञानाच्या मानवी जीवनातील महत्वावर प्रकाश टाकला आणि त्याचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमाच्या वेळी प्रा. नितीन गंगाणे, एम. एस. गणाचारी, एन. एस. महांते शेट्टी, डॉ. एम. दयानंद, डॉ. व्ही. डी. पाटील, एम. बी. जाली, डॉ. अरिफ मालदार, डॉ. राजेश पोवार, डॉ. व्ही. एम. पत्तणशेट्टी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments