Belagavi

येळ्ळूर ग्रामपंचायतीत घोटाळा : चालू वर्षात 29 कामे न करताच लाटले 54 लाख 29 हजार रुपये

Share

येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या चालू वर्षात 29 कामे झाली नसून सुमारे 54 लाख 29 हजार रु. येथील ग्राम पंचायत अध्यक्षाने बेकायदेशीरपणे ठराव पास करून शासनाचा पैसा लुटल्याचा आरोप वकील सुरेंद्र उगारे यांनी केला.

बेळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. पतीचे नाव कंत्राटदार म्हणून टाकणाऱ्या येळ्ळूर गावच्या अध्यक्षा लक्ष्मी मासेकर यांनी ग्रामसभेत ठराव पास करून, कोरोनाच्या संकटकाळात २९ कामे झाल्याचे सांगून सरकारी पैशांची लूट केल्याचा आरोप गावातील काही सदस्यांनी केला आहे.

पीडीओ पूनम गडगे, सचिव सदानंद मराठे, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी श्रीधर बुचडी, तालुका पंचायत अधिकारी श्रीकांत नजरे, नागेश हुगार , दुरुंडेश्वर बन्नुर यांनी येळ्ळूर ग्रा.पं.च्या अध्यक्षाला बनावट कागदपत्र तयार करण्यास मदत केली आहे. ही बाब जिल्हा पंचायतीच्या सीईओच्या निदर्शनासही आणून दिली आहे. आता ग्रामस्थ लोकायुक्तांकडे तक्रार करण्याची तयारी करत आहेत. असे ते म्हणाले .

ग्रा.पं.चे उपाध्यक्ष प्रमोद पाटील, सदस्य सतीश पाटील, शिवाजी नंदुकर, रमेश मेणसे, परशुराम परी ठ , ज्योतिबा जौगुले, मनीषा घाडी , शालन पाटील, सोनाली आदी उपस्थित होते.

Tags: