Belagavi

हिंदू युवकावर भीषण हल्ला; बजरंग दलाची निदर्शने

Share

रामनगर येथे (समिति कॉलेजच्या जवळ) हिंदू समाजातील युवकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी बेळगावमधील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली.

बेळगावमधील रामनगर येथे हिंदू समाजातील युवकावर इतर समाजातील 15 हून अधिक युवकांनी भीषण हल्ला केल्यामुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या प्रकरणी कडक कारवाई व्हावी, अशी मागणी करत गुरुवारी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी राणी कित्तूर चन्नम्मा चौकात आंदोलन करत तीव्र संताप व्यक्त केला.

मागील एका महिन्यापूर्वी देखील हिंदू युवकावर हल्ला झाला होता आणि त्या वेळी पोलिसांना कडक कारवाई करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तरीही पुन्हा हल्ला झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संताप वाढला आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी अतिरिक्त तपास सुरू असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

Tags: