मंदिरांमध्ये चोरी करून, मूर्तीवरील सोन्याचांदीचे दागिने चोरून नेणाऱ्या चोरट्याने गजाआड करण्यात हारुगेरी पोलिसांना यश आले आहे . अटकेतील आरोपींकडून तब्बल एकूण 11,52,500/- रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक भीमा शंकर गुळेद तसेच डीसीपी श्रुती यांच्या मार्गदर्शखाली पोलिसांचे एक पथक तयार करून या प्रकरणाचा तपास करण्यात आला आणि चार आरोपीना अटक करण्यात आली . अटकेतील आरोपींनी अलगवाडी, बस्तवाड, मुगळखोड. हिडकल. हारुगेरी, निडगुंदी आणि सत्ती गावात एकूण 8 मंदिरे फोडून चोरी केल्याची कबुली दिली आहे .
आरोपींकडून , चोरीचे सोन्या चांदीचे दागिने आणि 120,000/- रुपये किमतीची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल असा एकूण 11,52,500/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हारुगेरी पोलीस स्थानकाचे सीपीआय डी बी रविचंद्र यांच्या नेतृत्वाखाली , पीएसआय मलप्पा पुजारी. बी. एल . होसट्टी, रमेश पुरदिमनी,. ए. ए. शिंदे , पी. एम. सप्तसागर, एच. आर. आंबी, विनोद ठकन्नावर यांनी तपास केला. बेळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक भीमा शंकर गुळेद यांनी या तपास [पथकातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
Recent Comments