वक्फ दहशतवाद निर्माण करत असून हा एकप्रकारचा भुजिहाद आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी केली.
वक्फ बोर्डाकडून देण्यात येत असलेल्या नोटिसींविरोधात आज विजयपूरमध्ये छेडण्यात आलेल्या आंदोलनात त्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली आहे. त्या पुढे म्हणाल्या, १९७४ ची वक्फ अधिसूचना रद्द करावी. सध्या सुरु असलेल्या गोंधवर भाजप गप्प बसणार नाही, याप्रकरणी आंदोलन छेडण्यात येणार असून राज्यात सर्वत्र वक्फचीच अधिक मक्तेदारी दिसून येत आहे.
राज्यात हिंदू मंदिरे,मठ, शेजाऱ्यांच्या जमिनी शिल्लक राहिल्या नाहीत. याविरोधात विजयपूरमध्ये लढा सुरु असून आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या लढ्यात मीदेखील सहभागी असल्याचे त्या म्हणाल्या. उडुपीमध्ये त्यांनी सुलतानपूर नावाचे गाव वसवले, हे निंदनीय आहे असे सांगत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सरकारवर मंत्री शोभा करंदलाजे यांनी कडाडून टीका केली.
Recent Comments