नुकत्याच झालेल्या पावसामुळे , नाला ओसंडून वाहिल्याने, पुलावरील अर्धा रास्ता वाहून गेल्याची घटना कलघटगी विधानसभा मतदारसंघातील देवर हुबळी ते मुरुकट्टी गावादरम्यान घडली आहे .
धारवाड जिल्ह्यातील कलघटगी विधानसभा मतदारसंघातील देवर हुबळी ते मुरुकट्टी गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरील छोटा पूल नाल्याला आलेल्या पुरामुळे , अर्ध्या रस्त्यासह वाहून गेला आहे. त्यामुळे नाल्याचे पाणी वाहून जाण्यासाठी बसवलेल्या पुलाच्या पाईपलाईनमुळे रस्त्याचा वरचा अर्धा भाग वाहून गेला आहे. तसेच रस्त्याच्या खालच्या भागातील माती पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे वाहून गेली आहे.
आतील रस्त्याचा रोज वापर करणारे शेतकरी, वाहनधारक, शाळकरी मुले जिल्हा प्रशासन व जिल्ह्याचे पालक मंत्री संतोष लाड यांच्या दुर्लक्षाबद्दल तीव्र संताप व्यक्त करीत आहेत . आधीच पुलासह अर्धा रस्ता उखडला आहे, बाकी अर्धा रस्ता कधी उखडला जाईल माहीत नाही. त्यामुळे जिल्ह्याचे पालक मंत्री संतोष लाड तातडीने या ठिकाणी भेट देऊन आपल्या गृह मतदारसंघातील ग्रामस्थांच्या समस्या सोडवतील की नाही, याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
Recent Comments