छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या शौर्य, साहस, स्वाभिमान, संस्कृती, संस्कृती आणि साहस यासाठी ओळखल्या जाणाऱ्या कथा ऐकून आपले हृदय अभिमानाने भरून येते, अशी प्रतिक्रिया महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.
रविवारी सायंकाळी बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील निलजी गावात उभारण्यात आलेल्या धर्मवीर संभाजी महाराजांच्या नूतन मूर्तीच्या लोकार्पणप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या, छत्रपती शिवरायांचे सुपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना बालपणापासूनच अकल्पनीय त्रास सहन करावा लागला.
आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून हिंदू राष्ट्र आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी लढणारा ते शूर पुरुष होते. अशा महान व्यक्तीची मूर्ती गावात प्रतिष्ठापना केली जाते, हि अभिमानाची गोष्ट आहे. त्यांचा आदर्श पुढील पिढीसाठी मार्गदर्शक ठरावा, असे त्या म्हणालाय.
श्रीराम सेना हिंदुस्थानचे संस्थापक रमाकांत कोंडुस्कर बोलताना म्हणाले, महापुरुषांचे पुतळे स्थापन करणे इतकेच पुरेसे नाही तर त्यांचे आदर्श देखील अंगीकारणे गरजेचे आहे. तरुणांनी दुर्गुणांचे गुलाम न राहता समाजात अनुकरणीय कार्य केले पाहिजे. नव्या पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांचा समावेश करून महिलांचे संरक्षण आणि त्यांचा आदर करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमास उपस्थित असलेले प्रमुख वक्ते सुदर्शन शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास व विचारधारा यावर मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले.
यावेळी निलजी अलौकीक मंदिराचे श्री शिवानंद गुरुजी, सुदर्शन शिंदे, युवा काँग्रेसचे नेते मृणाल हेब्बाळकर, जयवंत बाळेकुंद्री, बाळू देसुरकर, सीके पाटील, सतीश गणगुटकर, नागेश देसाई, भरत पाटील, भाकप कल्याणशेट्टी, विनंती गोमनाचे, मनोहर बेळगावकर, चंद्रकांत कोंडुसकर, राघवेंद्र कोचेरी, गावातील नेतेमंडळी, मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Recent Comments