भाजपवाल्यांना आणि कुमारस्वामींना खोटे बोलण्याशिवाय दुसरे काही येत नाही. भाजप वक्फ प्रकरणी राजकारण करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री सिध्दरामय्यांनी केला. बंगळुरू येथील मेथोडिस्ट चर्चमध्ये सरदार पटेल यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी देशाच्या अखंडतेची शपथ देण्यात आली. यात अनेक मंत्री, आमदार, अधिकारी आदींचा सहभाग होता.
यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, भाजप राज्य पोटनिवडणूक आणि महाराष्ट्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण करत आहे. याचाच भाग म्हणून ४ नोव्हेंबर रोजी आंदोलन करणार आहे. भाजप सरकारच्या काळातही विविध जिल्ह्यातील 200 हून अधिक शेतकऱ्यांना वक्फच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. आता त्यांनी दुहेरी राजकारण करणे योग्य नाही. आम्ही शेतकऱ्यांना दिलेली नोटीस परत घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भाजप आणि कुमारस्वामी कधीच सत्य सांगत नाहीत. ते खोटे बोलण्याशिवाय दुसरे काय करतात? त्यांचे काम अस्तित्वात नसलेले वाद निर्माण करणे आहे. तीनही मतदारसंघात काँग्रेसचा विजय होईल. नोव्हेंबर 4 ते 11 तारखेपर्यंत तीन मतदारसंघात प्रचार करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शक्ती योजनेच्या सुधारणेबाबत शासनापुढे कोणतेही प्रस्ताव नाहीत. याबाबत सरकारचा कोणताही हेतू नसल्याचे ते म्हणाले.
Recent Comments