बेळगाव महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सकाळी सकाळीच फटाक्यांच्या दुकानावर छापा टाकून 100 किलो अवैध फटाके जप्त केले.
प्रदूषणमुक्त फटाक्यांच्या वापराबद्दल जागृती आणि पर्यावरण प्रदूषण नियंत्रणासाठी , बेळगाव महापालिकेच्या आयुक्त शुभा बी यांच्या नेतृत्वाखाली , आरोग्य अधिकारी आणि आरोग्य निरीक्षकांच्या पथकाने बेळगावच्या रविवार पेठेतील फटाक्यांच्या दुकानावर छापा टाकला. या छाप्यात सुमारे 100 किलो अवैध फटाके जप्त करण्यात आले.

प्रदूषण नियंत्रण कायदा 1981, 1983 आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.


Recent Comments