रायबाग तालुक्यातील अळगवाडी येथील हुणसिकोडी येथील शेतवाडीत असणाऱ्या सात लेकरांच्या आईच्या देवस्थानात चोरीचा प्रकार घडला होता. याप्रकरणाचा हारुगेरी पोलिसांनी छडा लावत चार आरोपींना अटक केली आहे.
रायबाग तालुक्यातील अळगवाडी येथील हुणसिकोडी येथील शेतवाडीत असणाऱ्या सात लेकरांच्या आईच्या देवस्थानात चोरी झाल्याप्रकरणी येथील अनिल शंकर दत्तवडे यांनी हारुगेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. बेळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. भीमा शंकर गुळेद आणि अतिरिक्त एसपी श्रुती. एन. एस. यांच्या आदेशानुसार अळगवाडी, बस्तवाड, मुगळखोड, हिडकल, हारुगेरी, नीडगुंडी, अप्पर पोलीस अधीक्षक आर. बी. बसरगी व अथणी उपविभागीय पोलीस उपअधीक्षक प्रशांत मुन्नोळ्ळी यांच्या मार्गदर्शनाखाली हारुगेरी सीपीआय रविचंद्र. डी. बी. आणि पीएसआय मलप्पा पुजारी व कर्मचाऱ्यांनी पथक तयार करून तब्बल 8 मंदिरात चोरी करणाऱ्या दिग्गेवाडी येथील शिवराज सुभाष कांबळे, मुगळखोडा येथील हणमंता महादेव कांबळे, निडगुंडी येथील रामाप्पा लक्ष्मण कांबळे, कंचकरवाडी येथील रुद्रेश शिवचंद्र कांबळे या चार आरोपींना अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून १०,२९,०००/- रु. किमतीचे 140.7 ग्रॅम सोन्याचे दागिने, 3500/- रुपयांचे 43 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, चोरीसाठी वापरण्यात आलेली १,२०,००० रुपये किमतीची होंडा युनिकोर्न मोटारसायकल असा एकूण ११५२५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत हारुगेरी पोलीस ठाण्याचे बी. एल. होसट्टी, रमेश मंदिनमनी, ए. एस. शांडगे, पी. एम. सप्तसागर, हारुगेरी पोलीस ठाण्याचे एच. आर. आंबी, विनोद ठक्कण्णावर आदींसह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या कारवाईमुळे वरिष्ठांकडून कारवाईत सहभागी पोलिसांचे कौतुक करण्यात आले आहे.
Recent Comments