धारवाडमध्ये मद्यधुंद अस्वस्थेतील महिलेने भर रस्त्यात गोंधळ घातल्याने महिलेच्या उपद्व्यापामुळे वाहनचालकांना डोकेदुखी ठरली.
धारवाड मधील कोर्ट सर्कल नजीक असलेल्या सिग्नल परिसरात हा प्रकार आज घडला असून पाऊस सुरु झाल्याने वाहनचालक काहीकाळ थांबले होते. याचदरम्यान या महिलेने या भागात गोंधळ घातला. पाऊस थांबल्याने वाहन चालक पुन्हा मार्गस्थ होत असताना मद्यधुंद अवस्थेतील महिलेने रस्त्यावर गोंधळ घातला.
रहदारी पोलिसांनी महिलेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु सदर महिला समजून घेण्याच्या परिस्थितीत नव्हती. यावेळी वाहनचालकांशीही सदर महिलेने हुज्जत घातली. अखेर स्थानिक नागरिकांनी महिलेला हाताशी धरून रस्त्याच्या शेजारी नेऊन सोडले आणि वाहतुकीचा मार्ग मोकळा करून दिला.
Recent Comments