कलघटगी मुत्तगी गावात दूषित पाणी पिल्याने ग्रामस्थ अत्यवस्थ झाल्याची घटना घडली असून ग्रामस्थांना तालुका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या केंद्राला भेट देऊन माजी वि. प. सदस्य नागराज छब्बी यांनी रुग्णांची विचारपूस केली.
भाजप नेते, माजी विधान परिषद सदस्य नागराज छब्बी यांनी तालुका आरोग्य केंद्रात दाखल केलेल्या रुग्णांच्या तब्येतीची विचारपूस केली. गेल्या शनिवारी कलघटगी तालुक्यातील मुत्तगी गावातील 50 हून अधिक लोकांना अचानक आमांशाचा त्रास सुरु झाला. तातडीने या ग्रामस्थांना तालुका आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. या प्रकरणाची माहिती मिळताच नागराज छब्बी यांनी तालुका आरोग्य केंद्राला भेट देऊन ग्रामस्थांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

याशिवाय ग्रामस्थांच्या या समस्येचे कारण काय, याबाबत तालुका रुग्णालयाच्या मुख्याधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.. रुग्णालयात दाखल झालेल्या ग्रामस्थांना यावेळी फळांचे वाटपही करण्यात आले.


Recent Comments