आज वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस. बेळगाव शहरात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने वसुबारस निमित्त आज गोमातेची दर्शन यात्रा काढण्यात आली.
आज दिवाळीचा पहिला दिवस. वसुबारस.. आजच्या दिवशी गायी आणि वासरांची पूजा करण्याचा विशेष दिवस. ही परंपरा आजही ग्रामीण भागात पाळली जाते. पण पाळीव गायी शहरी भागात आढळत नाहीत. त्यामुळे गेल्या 4 वर्षांपासून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्या वतीने श्री सिद्धेश्वर गोशाळेच्या सहकार्याने वसुबारसच्या निमित्ताने , गोमातेची दर्शन यात्रा काढण्यात येत आहे. या वेळीही शहरात गोमातेची दर्शन यात्रा काढण्यात आली.

शहरातील विविध मार्गांनी प्रवास करून छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या सर्कलमध्ये पोहोचून शंभूतीर्थावर महापूजा करून यात्रेची सांगता झाली. यावेळी श्री सिद्धेश्वर गोशाळेच्या प्रमुखांनी गायींचे महत्त्व सांगितले.
यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व श्री सिद्धेश्वर गो शाळेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.


Recent Comments