राज्यातील तीन विधानसभा पोटनिवडणुकांची उत्कंठा वाढली आहे. केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामी आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यातील टॉक वॉर सुरूच असून केंद्रीय मंत्री कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना टोला लगावला आहे.
रडणाऱ्या नेत्यांना पाहून, भावनिक भाषणे आणि अश्रूंना आता लोक कंटाळले आहेत, असा टोला मुख्यमंत्री सिध्दरामय्यांना केंद्रीय मंत्री कुमारस्वामींनी लगावला. आता लोकांचे अश्रू पुसण्याची वेळ आली आहे. तिन्ही मतदार संघात आमचाच विजय निश्चित आहे. सत्ता आणि पैशाचा गैरवापर करून काँग्रेस ही निवडणूक जिंकणार नाही. काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून येणार नाही, असा दावाही त्यांनी केला.
मी आता माझ्या मतदार संघापुरता मर्यादित नाही. मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून मी करत असून मी केलेल्या कामाचा हा पुरावा आहे. माझा टी आर पी आता वाढला असून मी मतदार संघात प्रवेश घेताच काँग्रेस मला घाबरत असल्याची टीकाही त्यांनी केली.


Recent Comments