Belagavi

बेळगावात आयुर्ज्योती रॅलीमार्फत आयुर्वेदाबद्दल जनजागृती

Share

भारतातील सर्वात जुनी उपचार पद्धती असलेल्या आर्युवेदाबाबत जनजागृती करण्यासाठी बेळगाव शहरात आयुर्ज्योती यात्रा काढण्यात आली.  शनिवारी बेळगावातील के.एल.ई. संस्थेच्या श्री बी.एम. कंकणवाडी आयुर्वेदिक महाविद्यालय, डॉ. रवी पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, एसबीजी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल आणि अरिहंत हॉस्पिटलच्या आवारात धनत्रयोदशीला साजरा होणाऱ्या आर्युवेद दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतातील सर्वात जुनी वैद्यकीय प्रणाली असलेल्या आयुर्वेदाविषयी जनजागृती करण्यासाठी बेळगाव शहरात आयुर्ज्योती यात्रा काढण्यात आली.

9 व्या आर्युवेद दिनाच्या पार्श्वभूमीवर आयुर्वेद या पारंपारिक उपचार पद्धतीबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी याचे आयोजन केले आहे. आयुर्वेद शास्त्र फार प्राचीन आहे आणि ते सर्वांनी पाळले पाहिजे. 2016 पासून, दरवर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी आयुर्वेद दिन साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर आज आयुर्ज्योती यात्रेमार्फत कृतीशीलपणे जागृती केली जाणार आहे. सरकारने यावेळी आयुर्वेद इनोव्हेशन फॉर ग्लोबल हेल्थ असा नारा दिला आहे. आयुर्वेदाचा वापर नियमितपणे करावा. असे श्री बी.एम. कंकणवाडी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवी किरण म्हणाले.


शहरातील संचयनी सर्कल ते राणी चेन्नम्मा सर्कल अशी ही जनजागृती रॅली काढण्यात आली . यावेळी एसबीजी आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे डॉ. आडिवेश , केएलई मेडिकल कॉलेजचे डॉ. सुहास शेट्टी यांच्यासह आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता

Tags: