बेळगावमध्ये अनेक ठिकाणी स्मार्ट सिटी अंतर्गत कामकाजात भ्रष्टाचार झाल्याचे वारंवार सिद्ध होत आहे . रामतीर्थनगर येथे पेव्हर्स बसवण्यात आलेला रस्ता खचून त्यामध्ये मालवाहू ट्रक अडकल्याची घटना घडली आहे .
आता रामतीर्थ नगर येथील गणेश सर्कल नजीक बसविण्यात आलेल्या पेव्हर्स रस्त्याचे खच्चीकरण होऊन मालवाहू ट्रक अडकल्याचे समोर आले आहे.
रामतीर्थ नगर येथील गणेश सर्कल परिसरात पेव्हर्स रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र शहरातील इतर कामकाजाप्रमाणेच याठिकाणीही निकृष्ट दर्जाचे कामकाज स्मार्ट सिटी अंतर्गत झाले असून पेव्हर्स बसविण्यात आलेला रस्ता खचला आहे . यावं भागात आता वाहने पार्क करणे देखील अवघड झाले असून मालवाहू ट्रक या पेव्हर्समध्ये अडकून बसल्याचे चित्र पाहायला मिळाले.
स्मार्ट सिटी अंतर्गत घिसाडघाईने निकृष्ट दर्जाची कामे करण्यात आल्याचे समोर येत असून यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देखील जनतेतून केला जात आहे .


Recent Comments