येथे जाणाऱ्या टाटा एस वाहनाची मागून चालत्या लॉरीला धडक बसून तीन जण जखमी झाल्याची घटना धारवाडच्या बाहेरील राष्ट्रीय महामार्गावरील रम्या रेसिडेन्सीजवळ रात्री उशिरा घडली.
धारवाड बाहेरील भागात रम्या रेसिडेन्सीजवळ हुबळी येथून राष्ट्रीय महामार्गाने टाटा एस गाडी बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती यल्लमा मंदिराला जात होती . यावेळी रम्या रेसिडेन्सीजवळ येत असताना टाटा एसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने चालत्या लॉरीला धडकले. या घटनेत तीन जण किरकोळ जखमी झाले असून, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

ही घटना उघडकीस येताच स्थानिक वाहनचालकांनी टाटा एसच्या प्रवाशांची सुटका केली. या प्रकरणाची माहिती मिळताच ग्रामीण ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. पोलिसांच्या तपासानंतर जखमींची नावे समजतील .


Recent Comments