Banglore

अखेर सीपी योगेश्वर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Share

गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चा होत असताना कुमारस्वामी यांनी सांगितल्याप्रमाणे सीपी योगेश्वर यांनी शेवटच्या क्षणी काँग्रेसमध्ये प्रवेश करून भाजप जेडीएस आघाडीच्या नेत्यांना मोठा धक्का दिला आहे.

चन्नपटण पोटनिवडणुकीच्या रिंगणात सीपी योगेश्वर यांनी भाजपच्या तिकिटावर एनडीएचे उमेदवार म्हणून लढण्याचे शंभर प्रयत्न केले होते. मात्र, कुमारस्वामी यांनी परवानगी नाकारल्याने जेडीएसच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती. दरम्यान सीपी योगेश्वर यांनी कुमारस्वामी यांनी दिलेली ऑफर नाकारत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

बेंगळुरूमधील केपीसीसी कार्यालयात सीएम सिद्धरामय्या यांच्या अनुपस्थितीत सी. पी. योगेश्वर यांनी उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे सी पी योगेश्वर चन्नपटण पोटनिवडणुकीत काँग्रेसमधून निवडणूक लढवणार हे निश्चित आहे. सी.पी. योगेश्वर यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेऊन चर्चा केली होती. यानुसार आज उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, मंत्री शिवराज तंगडगी, जमीर अहमद खान, आमदार डॉ. यतींद्र सिद्धरामय्या, पोन्नण्णा, माजी खासदार डी.के. सुरेश यांच्या उपस्थितीत सी.पी. योगेश्वर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

सीपी योगेश्वर यांचे पक्षात स्वागत केल्यानंतर उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार म्हणाले की, सी.पी. योगेश्वर यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात काँग्रेसमधून केली आणि येथून पुन्हा राजकारणाला सुरुवात केली. वरिष्ठांच्या परवानगीने योगेश्वर यांचा पक्षात समावेश करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

जेडीएस आणि एनडीएने भाजपसोबत युती केल्याने आपले भविष्य आता नाही हे लक्षात घेत कोणत्याही अटी किंवा दबावाशिवाय काँग्रेसमध्ये आपण प्रवेश केला, अशी प्रतिक्रिया सी. पी. योगेश्वर यांनी व्यक्त केली. आपण पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून विकास हेच आमचे ध्येय आहे. सरकारच्या विविध सक्रिय प्रकल्पांच्या विकासासाठी मी सहकार्य कारेन. काँग्रेस पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मंत्री जमीर अहमद खान, रामलिंग रेड्डी. डी.के. सुरेश आदी उपस्थित होते.

Tags: