वीर राणी कित्तूर चन्नम्मा यांचे जन्मस्थान असलेल्या बेळगाव तालुक्यातील काकती गावात 200 वा कित्तूर उत्सव मोठ्या थाटात पार पडला. यावेळी काढण्यात आलेल्या शोभायात्रेनेही लक्ष वेधले.
बेळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री सतीश जारकीहोळी, उत्तरचे आमदार आसिफ सेठ, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, ग्रामपंचायत अध्यक्ष, सदस्य व इतर मान्यवरांनी राणी चन्नम्माला यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यानंतर राणी चन्नम्मा विजयोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीची सुरुवात राणी चन्नम्मा यांची प्रतिमा विराजित असलेल्या बैलगाडी पूजनाने करण्यात आली.
या मिरवणुकीत विविध कला- वाद्य पथकांचा समावेश होता. लोक कला पथकांच्या सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या मिरवणुकीत राणी कित्तूर चन्नम्मा यांच्या वेशभूषेतील बालकलाकारांसह सर्वच कलाकारांनी लक्ष वेधले.
या मिरवणुकीत विविध मान्यवर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Recent Comments