Athani

अपघातात 7 जण गमावलेल्या अझूर कुटुंबियांना वर्ष उलटूनही अद्याप नाही मदतीचा हात

Share

देवाचे दर्शन घेऊन तिरुपतीला परतत असताना तेलंगणातील कडप्पा-चित्तूर राष्ट्रीय महामार्गावर लॉरी आणि क्रूझर यांच्यात झालेल्या भीषण अपघात वर्षभरापूर्वी झाला होता . तालुक्यातील बडची गावातील १५ जणांच्या कुटुंबाच्या या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला . वर्ष उलटून गेले तरी या अपघातग्रस्त कुटुंबाच्या मदतीला कोणीही लोकप्रतिनिधी सरकार धावून आले नाही .

अपघातात हणमंत अजुर (40), महानंदा अजुर (32), शोभा अजुर (36), चालक हणमंत जाधव (42), अंबिका (14) यांचा जागीच मृत्यू झाला, तर कस्तुरी, मेघा, शिवानंद, बसाप्पा, मल्लप्पा अक्षता, उदय , सुनंदा, महेश, साक्षी आणि बसवराजसह 11 जण जखमी झाले असून काही जण बरे झाले आहेत.

मात्र सांत्वनासाठी आलेले सरकार आणि लोकप्रतिनिधी या अपघातग्रस्त कुटुंबीयांच्या मदतीला आले नाही कि एक रुपयाही भरपाई दिली नाही, ही शोकांतिका आहे. अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी, माजी आमदार महेश कुमठल्ली , मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, मंत्री सतीश जारकीहोळी, या सर्वांनी भेट देऊन कुटुंबाचे सांत्वन केले व मदतीचे आश्वासन दिले. मात्र एकाही लोकप्रतिनिधीने भरपाई दिलेली नाही ,

तेलंगणा सरकारी अधिकाऱ्यांचा खर्च, मृतदेह आणण्यासाठी आणलेल्या वाहनांचा एकूण खर्च आणि उर्वरित रुग्णालयाचा खर्च 40 लाखांची मालमत्ता विकून भागवण्यात आल्याचे स्वतः मल्लाप्पा अजुर यांनी सांगितले .

Tags: