संतोष पद्मन्नावर खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत रवानगी केलेल्या चार आरोपीना , आज अधिक चौकशीसाठी , न्यायालयाच्या परवानगीने , माळमारुती पोलिसांनी ताब्यात घेतले . न्यायालयाने या आरोपीना चार दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे .
बेळगाव शहरातील , अंजनेय नगर येथील रिअल इस्टेट व्यवसायिक संतोष पद्मण्णावर यांचा त्यांची पत्नी उमा पद्मण्णावर हिने आपल्या फेसबुक फ्रेंड्स च्या मदतीने खुन केला होता . तपासानंतर माळमारुती पोलीस स्थानकाचे सीपीआय कालीमिर्ची आणि सहकाऱ्यांनी उमा पद्मण्णावर शोभित गौडा , पावन आणि मंजुनाथ या चार आरोपीना अटक करून , न्यायालयाच्या समोर हजर केले होते . न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती .
आज या खून प्रकरणाच्या अधिक तपासासाठी , माळमारुती पोलिसांनी न्यायालयाच्या परवानगीने चार दिवसांसाठी पोलीस कस्टडीत घेतले . आज २२ ऑक्टोबर संध्याकाळी पाच वाजल्यापासून , २५ ऑक्टोबरला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत माळमारुती पोलीस आरोपींची चौकशी करणार आहेत . दुसरे जेएमएफसी न्यायालयाच्या न्यायाधीश पंकजा कोण्णूर यांनी आरोपीना पोलीस कस्टडीची परवानगी दिल्याचे ऍड . शामसुंदर पत्तार यांनी सांगितले .
Recent Comments