बेळगावच्या सांबरा विमानतळावर बॉम्ब ठेवल्याची धमकी इ मेल द्वारे पाठवण्यात आली होती . मात्र विमानतळाची कसून तपासणी नंतर ही धमकी खोटी असल्याचे आढळून आले आहे .
बेळगाव येथील सांबरा विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचे धमकीचे पत्र विमानतळ संचालक त्यागराज यांच्या ई-मेलवर पाठवण्यात आले होते . . ही धमकी चेन्नई येथून आल्याची माहिती मिळाली असून श्वान पथक आणि बॉम्बशोधक पथकाने तपास केला आहे.
बॉम्बच्या धोक्यामुळे विमानतळावर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. याप्रकरणी मारिहाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Recent Comments