म्हैसूर येथील रामकृष्ण एथिकल अँड स्पिरिच्युअल इन्स्टिट्यूटचे प्रमुख स्वामी महामेधानंद यांनी सांगितले की, लहान मुलांवर संस्कार करण्याबरोबरच त्यांच्यात मानवी मूल्ये रुजवली पाहिजेत.
स्वामी विवेकानंदांच्या बेळगाव दौऱ्याच्या १३२ व्या वर्धापन दिनानिमित्त आज बेळगाव येथील किल्ले आवारातील रामकृष्ण आश्रमात पालकांची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत उत्तम मुले घडवावी या विषयावर चर्चा झाली
स्वामी महामेधानंद यांनी “मुलांचे संगोपन करण्याची कला” या विषयावर व्याख्यान दिले आणि पालकांनी मुलांचे संगोपन करताना काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. मुलांना घरकामात गुंतवून त्यांची कामे करण्याची सवय लावावी. त्यांनी पालकांना , अहंकार न बाळगता मुलांमध्ये मानवी मूल्ये रुजवण्याचे आवाहन केले.
स्वामी मोक्षतमानंद, प्रा.जी.एस.जयदेव, प्रा.एच.एन.मुरलीधर या वेळी उपस्थित होते.
Recent Comments