सणासुदीच्या निमित्ताने बेळगावकरांसाठी आनंदाची बातमी आली असून स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे ग्राहकांसाठी दोन दिवसीय गृह आणि वाहन कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने मिलेनियम गार्डन, बेळगाव येथे दोन दिवसीय मेगा होम आणि ऑटो लोन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. घर खरेदी, सदनिका खरेदी, वाहन खरेदीसाठी आकर्षक कर्जे देऊन तुमचे स्वप्न साकार करण्यासाठी एका विशाल कर्ज मेळाव्याचे आयोजन केले.
आज बेळगाव बुडा आयुक्त शकील अहमद, हुबळी उपमहाव्यवस्थापक पी.एल. श्रीनिवास राव, बेळगाव विभागीय व्यवस्थापक विकास भगोत्रा, बेळगाव मुख्य शाखेचे एजीएम जयकुमार, एजीएम सुमा जीके आदी उपस्थित होते. या मेळाव्याचा शुभारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
हुबळीचे उपमहाव्यवस्थापक पी.एल. श्रीनिवास राव म्हणाले की, इतर शहरांच्या तुलनेत बेळगावमध्ये या जत्रेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. येथे 60 हून अधिक बांधकाम व्यावसायिक आहेत. तसेच अपार्टमेंट व्यवस्थेला बेळगावात चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच हे शहर महाराष्ट्र राज्याच्या जवळ असल्याने आजचा कर्जमेळावा त्यांच्यासाठीही सोयीचा आहे.
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात बेंगळुरू कर्ज मेळावा आयोजित करण्यात आला होता. आज बेळगाव आणि हुबळी या दोन शहरांमध्ये ग्राहकांच्या मदतीसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सणासुदीच्या काळात कमी व्याजदरात कर्ज देऊन ग्राहकांची स्वप्ने पूर्ण करण्याचे काम स्टेट बँक ऑफ इंडिया करत असल्याचे ते म्हणाले.
बेळगाव बुडाचे आयुक्त सी.डब्ल्यू.शकील अहमद म्हणाले की, पूर्वी ‘लग्न पाहावे करून आणि घर पाहावे बांधून’ अशी म्हण होती, मात्र कालांतराने या म्हणीत बदल झाला असून आता यामध्ये कार खरेदी करण्याचे स्वप्नही जोडले गेले आहे. अशी स्वप्ने पाहणाऱ्या नागरिकांसाठी एसबीआयतर्फे कर्जमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इतर शहरांच्या तुलनेत बेळगाव शहराची प्रतिमा वेगळी आहे. येथील लोकांचे जीवनमान प्रगतशील असून त्यानुसार त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी एसबीआयने पुढाकार घेतल्याचे ते म्हणाले.
यावेळी ग्राहक, बिल्डर आणि एसबीआयचे कर्मचारी उपस्थित होते.
Recent Comments