Belagavi

बेळगावच्या महिलेला हृदय शस्त्रक्रियेसाठी महाराष्ट्र शासनाकडून मदत

Share

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रयत्नातून हृदय शास्त्रक्रियेसाठीं बेळगाव येथील महिलेला महाराष्ट्र शासनातर्फे एक लाख रुपयांच्या साह्यनिधीचा धनादेश वितरित करण्यात आला.

हिंडलगा येथील रहिवासी पुष्पलता दामोदर भोसले या हृदयविकाराने त्रस्त होत्या, त्यांच्यावर शस्त्रक्रियेसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रयत्नातून महाराष्ट्र शासनाकडून एक लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी पुष्पलता दामोदर भोसले याना धनादेशाचे वितरण केले .

शस्त्रक्रियेसाठी आर्थिक साह्य मिळाल्याने, भोसले कुटुंबीयांकडून महाराष्ट शासनाची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी व पुष्पलता दामोदर भोसले यांच्या कुटुंबीयांची उपस्थिती होती.

Tags: